भाजपचा परतीचा प्रवास सुरु : अशोक चव्हाण

खोट्या आश्वासनांना नांदेडची जनता बळी पडली नाही. शिवाय, खालच्या पातळीवरील प्राचाराचा पराभव झाला, असेही अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी, वाईट काळात काँग्रेसल नांदेडकरांनी साथ दिली, असे सांगत नांदेडकरांचे आभार मानायलाही अशोक चव्हाण विसरले नाहीत.

भाजपचा परतीचा प्रवास सुरु : अशोक चव्हाण

मुंबई : भाजपच्या खोट्या प्रचाराला नांदेडमधील जनतेने धुडकावलं आहे. भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. नांदेडमधील विराट विजयानंतर त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

“भाजपच्या फोडा-फोडीच्या राजकारणाला नांदेडमधील जनतेने चोख उत्तर दिले आहे. त्यांनी 5 ते 6 नगरसेवक फोडले. मात्र जे पक्ष बदलून भाजपमध्ये गेले, ते सर्वजण पराभूत झाले आहेत.”, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार भाजपचे उमेदवार ठरवतात. शिवसेनेचे आमदार आणि एक निवृत्त सनदी अधिकारी भाजपची निवडणूक धुरा सांभाळतात. भाजपने जुने कार्यकर्ते आणि आरएसएस कार्यकर्ते दुर्लक्षित केले.”, असेही चव्हाण म्हणाले.

खोट्या आश्वासनांना नांदेडची जनता बळी पडली नाही. शिवाय, खालच्या पातळीवरील प्रचाराचा पराभव झाला, असेही अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी, वाईट काळात काँग्रेसल नांदेडकरांनी साथ दिली, असे सांगत नांदेडकरांचे आभार मानायलाही अशोक चव्हाण विसरले नाहीत.

संबंधित बातमी :

नांदेडचा विजय हा खालच्या पातळीवरच्या प्रचाराला चपराक : चव्हाण

नांदेड वाघाळा महापालिका निकाल - विजयी उमेदवारांची यादी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV