अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील स्टॉल धारकांचे ठिय्या आंदोलन

बडोदा इथं सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपापूर्वी नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. कारण, संमेलनस्थळी सर्व स्टॉल धारकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील स्टॉल धारकांचे ठिय्या आंदोलन

बडोदा/ गुजरात : बडोदा इथं सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपापूर्वी नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. कारण, संमेलनस्थळी सर्व स्टॉल धारकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

स्टॉल धारकांच्या आंदोलनामुळे स्टॉलवरील पुस्तक विक्रीही बंद करण्यात आली होती. आयोजकांच्या आडमुठेपणामुळे स्टॉल धारकांवर आंदोलनाची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, आयोजकांकडून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यामुळे स्टॉल धारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, अशी स्टॉल धारकांची तक्रार केली.

दरम्यान, स्टॉल धारकांच्या ठिय्या आंदोलनानंतर आयोजकांनी दिलगिरी मागितली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: book sellers strike in barodas akhil bhartya marathi sahitya sammelan place
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV