एसटी-कंटेनरची धडक, कंटेनर नदीत कोसळला, बस कठड्यावर

जळगाव-बुलडाणा एसटीमधील चालक-वाहकासह 40 ते 50 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

एसटी-कंटेनरची धडक, कंटेनर नदीत कोसळला, बस कठड्यावर

बुलडाणा : बुलडाण्यात पूर्णा नदीवरील पुलावर एसटी आणि कंटेनर एकमेकांवर धडकून अपघात झाला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती, की कंटेनर नदीत कोसळला, तर एसटी पुलाच्या कठड्यावर तरंगत होती.

अपघातात कंटेनर नदीत कोसळून ड्रायव्हर-क्लीनरचा मृत्यू झाला, मात्र जळगाव-बुलडाणा एसटीमधील चालक-वाहकासह 40 ते 50 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

बुलडाण्यातील जळगाव-जामोद ते नांदुरा रस्त्यावर असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन जाताना एसटी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर 20 फूट पुलावरुन खाली नदीत पडला, तर एसटी बस पुलावरुन खाली पडता-पडता वाचली आणि पुलावर तरंगली.

यामध्ये 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहो. घटनास्थळी प्रशासन दाखल झालं असून मृतांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Buldana : ST Bus and container accident on Purna River latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV