सिंधुदुर्गात बैलाची दुहेरी झुंज, विहिरीत पडलेल्या बैलाला अखेर वाचवलं

बैलांची झुंज लावणं कोकणातील एका व्यक्तीला चांगलंच महाग पडलं. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यात झुंज खेळता-खेळता बैल विहिरीत पडला आणि त्यानं मृत्यूशी पुन्हा झुंज दिली.

By: | Last Updated: 10 Dec 2017 07:17 PM
सिंधुदुर्गात बैलाची दुहेरी झुंज, विहिरीत पडलेल्या बैलाला अखेर वाचवलं

सिंधुदुर्ग : बैलांची झुंज लावणं कोकणातील एका व्यक्तीला चांगलंच महाग पडलं. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यात झुंज खेळता-खेळता बैल विहिरीत पडला आणि त्यानं मृत्यूशी पुन्हा झुंज दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेडीमध्ये बैलाची झुंज खेळवली जात होती. मात्र त्याचवेळी रेडीतील बोंडोजीवाडी विठ्ठल मंदिराजवळील विहिरीत हा बैल पडला आणि एकच गोंधळ उडाला. विहिरही अरुंद असल्यानं बैलाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ ग्रामस्थांना करावी लागली.

दरम्यान रेडीच्या विहिरीत पडलेला बैल हा बापू बागायतकर यांचा आहे. ग्रामस्थांनी अथक परिश्रमानंतर बैलाला विहिरीतून बाहेर काढले आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bull fallen down in well while fighting in sindhudurg latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV