दोन एसटींची धडक, केबिनचा चक्काचूर, ड्रायव्हर ठार, 30 जखमी

अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ आज सकाळी 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दोन एसटींची धडक, केबिनचा चक्काचूर, ड्रायव्हर ठार, 30 जखमी

बीड: दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, बस चालकाचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत.

अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ आज सकाळी 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

गंगाखेड - पुणे आणि लातूर - परभणी या दोन बस वेगाने समोरासमोर आल्या. दोन्ही बसवर चालकांचं नियंत्रण राहिलं नाही, त्यामुळे त्या एकमेकींना धडकल्या.

या अपघातात लातूर - परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान,  सर्व जखमी प्रवाशांवर अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bus accident in beed
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV