औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव कारनं चिरडलं

औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव कारनं चिरडलं. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ घटना घडली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव कारनं चिरडलं

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव कारनं चिरडलं. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ घटना घडली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

आज सकाळी साडे सहा वाजता भागिनाथ गवळी (वय 56), नारायण वाघमारे (वय 65), दगडुजी ढवळे (वय 65) आणि अनिल सोनवणे (वय 45) हे चौघेही मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या एमएच 27  एसी 5282 या भरधाव स्कॉर्पिओ कारने चौघांना केंब्रिज शाळेजवळ चिरडलं. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

तर अजून तीन जण जखमी झाले असून, यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

दरम्यान, ही कार अमरावतीची असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV