विद्यमान आमदार, माजी मंत्र्यासह 28 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काल मध्यरात्री गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

विद्यमान आमदार, माजी मंत्र्यासह 28 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काल मध्यरात्री  गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

आमदार अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी 14 कोटी रूपये कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी तारण म्हणून कारखान्याची जमीन तारण ठेवली होती.

ही जमीन आमदार अमरसिंह पंडित यांनी बनावट कागदपत्रं तयार करून दुसऱ्याच व्यक्तीस साडेतीन लाख रुपयांना विकली. त्यामुळे बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: case filed against 28 including MLA and ex minister in Beed
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV