भूतबाधेच्या भीतीने बलात्कार, व्हिडीओची धमकी देत 30 तोळे लुटले

हैदरअली शेख असं या भोंदूबाबाचं नाव आहे. अशाच गुन्ह्यात या भोंदूला पुणे पोलिसांनी या आगोदरच अटक केली होती.

भूतबाधेच्या भीतीने बलात्कार, व्हिडीओची धमकी देत 30 तोळे लुटले

सातारा: भूतबाधा झाल्याचं सांगून विवाहित महिलेवर बलत्कार करुन, त्याच्या व्हिडीओ क्लिपची धमकी देत, तब्बल तीस तोळे सोने लुटण्याचा प्रकार एका भोंदूबाबाने केला आहे. साताऱ्यात ही धक्कादायक घटना घडली.

या भोंदू बाबावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदरअली शेख असं या भोंदूबाबाचं नाव आहे. अशाच गुन्ह्यात या भोंदूला पुणे पोलिसांनी या आगोदरच अटक केली होती.

या भोंदूबाबाचं गुन्ह्याचं कृत्य अत्यंत संतापजनक आहे.

महिलांना भूतबाधा झाल्याचे सांगून, त्यांना गुंगी आणणारं औषध द्यायचं. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि त्याचा व्हिडीओ बनवून धमकावण्याचा उद्योग हा भोंदू करत असे.

अरोपी हैदरअली हा सातारा पुण्यासह अनेक ठिकाणी भोंदूगिरी करत फिरत होता. साताऱ्यातील एक विवाहित महिला वेळोवेळी आजारी पडत असल्यामुळे, तिला कुटुंबीयांनी या भोंदूबाबाकडे नेलं.

त्यावेळी कुटुंबीयांना बाहेर काढून या भोंदूने संबधित महिलेवर बलत्कार केला. बलात्कार करताना त्याने व्हिडीओ चित्रीकरण करुन ठेवले. नंतर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, संबंधित महिलेकडून तब्बल 30 तोळे सोने लंपास केले.

या प्रकाराने हादरलेल्या संबधित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला. सध्या अशाच एका भोंदूगिरीच्या प्रकरणात हैदरअलीला पुणे पोलिसांनी अटक केली असून तो सध्या त्यांच्या ताब्यात आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: case register against Bhondu baba in satara
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV