भाजप प्रवेशासाठी चंद्रकांत पाटलांनी 5 कोटींची ऑफर दिली : जाधव

गेल्या महिन्यातील दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी ऑफर दिल्याचं आमदार जाधव यांनी सांगितलं.

भाजप प्रवेशासाठी चंद्रकांत पाटलांनी 5 कोटींची ऑफर दिली : जाधव

औरंगाबाद : भाजप प्रवेशासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.

माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ऑफर दिली होती. गेल्या महिन्यातील दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी ऑफर दिल्याचं आमदार जाधव यांनी सांगितलं.

"निवडून न आल्यास विधानपरिषदेवर घेऊ, इतकंच नाही तर निवडणुकीचा सगळा खर्च आम्ही करु," अशी ऑफरही भाजपने दिल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांचा आरोप

"महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींमुळे भाजप त्रस्त आहे, असं मला चंद्रकांतदादा म्हणाले. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार गळाला लागतात का, यासाठी प्रत्येक आमदाराला पाच कोटींची ऑफर देऊन, त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणून, त्यांना भाजपमध्ये घ्यायचं आणि शिवसेनेला बाजूला सारायचं, असा आमचा प्रयत्न असल्याचं चंद्रकांतदादांनी मला सांगितलं. तिच ऑफर त्यांनी मलाही दिली होती. तुमच्या बदल्या प्रकरण असेल, कोणाच्या बदल्या करायच्या असतील, तर सगळं मला सांगा आणि तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही बायइलेक्शन लढा आम्ही तुम्हाला निवडून आणू, पैसे खर्च करु निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीने मग तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा. अशा पद्धतीने शिवसेनेचे इतर आमदारही सहभागी झाले तर शिवसेनेच्या दररोज होणाऱ्या त्रासातून आम्ही मुक्त होऊ, असं त्यांचं म्हणणं होतं.

त्यांनी ही ऑफर शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना दिलेली असं मला वाटतं. कारण ते बोलत असताना तसेच मला म्हणाले, आम्ही सगळ्यांनाच ऑफर देतोय, आमचं हेचं म्हणणं आहे की, तुम्ही पैसे घ्या, राजीनामा द्या, निवडणूक लढा, आम्ही भाजपच्या तिकीटावर तुम्हाला निवडून आणतो. निवडून आणल्यानंतर आम्हाला शिवसेनेला दूर करता येईल. शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांना ही ऑफर दिल्याचं मला वाटतं. पण शिवसेनेचा कोणताही आमदार गळाला लागेल असं मला वाटत नाही."

पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chandrakant Patil giver offer of Rs 5 crore to join BJP, claims Harshwardhan Jadhav
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV