चंद्रकांत पाटील राजीनामा द्या: अजित पवार

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रचे समन्वय मंत्री आहेत, असं असताना त्यांनी कर्नाटक गौरव गीत गाणं निषेधार्ह आहे, असं अजित पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील राजीनामा द्या: अजित पवार

नांदेड: बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकाचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार माहूर येथे बोलत होते.

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रचे समन्वय मंत्री आहेत, असं असताना त्यांनी कर्नाटक गौरव गीत गाणं निषेधार्ह आहे, असं अजित पवार म्हणाले.

आपल्या मंत्र्याने परराज्यात जरुर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता पाळावी असं अजित पवार यांनी नमूद केलं.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली.

मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर, पाटील यांनी भाषणाची सुरुवात 'हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू' (जन्माला यायचे तर कर्नाटकात जन्म घ्यावा) या कन्नड गाण्याने करून उपस्थितांना खुश केलं. उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याची ओळ म्हटल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात नाराजीचे वातावरण पसरलं आहे. कन्नड गाण्याची ओळ सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी प्रतिक्रिया मराठी युवा मंचचे सुरज कणबरकर यांनी दिली.

चंद्रकांत पाटलांची सीमाप्रश्नाच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी करावी आणि त्या जागी मराठीचा स्वाभिमान असणारी व्यक्ती नियुक्त करावी, अशी मागणी मराठी भाषिक युवकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला: मुंडे

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा हल्लाबोल धनंजय मुंडेंनी केला.

“महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या  चंद्रकांत पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी”, असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं.

संबंधित बातमी

चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाणं गायल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजी 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chandrakant Patil sings Kannad songs, Ajit Pawar demands resignation
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV