चंद्रपुरात चोरट्यांनी डीवायएसपींचं घर फोडलं!

पण त्याच रात्री घराला कुलुप लावून गस्तीसाठी घराबाहेर पडलेले विशाल हिरे यांचं घर चोरट्यांनी फोडलं

चंद्रपुरात चोरट्यांनी डीवायएसपींचं घर फोडलं!

चंद्रपूर : चंद्रपूरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. विशाल हिरे यांचं घर चोरट्यांनी फोडलं. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.

मूल शहरातील चार ते पाच घरात चोरी झाली होती. या प्रकरणी दोघांनी तक्रार दिली होती. हे प्रकरण फार मोठं आहे, असं सुरुवातीला कोणालाही वाटलं नव्हतं.

डॉ. विशाल हिरे मंगळवारी रात्री घराला कुलुप लावून गस्तीसाठी घराबाहेर पडले. पण त्याच रात्री चोरट्यांनी हिरे यांचं घर फोडलं. या चोरीत कपाटात ठेवलेली 15 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.

मात्र पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याची बातमी पसरल्याने जिल्हाभर कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chandrapur : Robbery at DYSP Dr Vishal Hire’s home
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV