महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोल, कर्नाटकात नाकावर टिच्चून बोर्ड झळकले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात येत आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निप्पाणी जवळच्या एका पेट्रोलपंप चालकाने अशाप्रकारचे फलक लावले आहेत सोशल मीडियातूनही यावरुन चांगलीच चर्चा रंगत आहे.

By: | Last Updated: 18 Sep 2017 12:13 PM
महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोल, कर्नाटकात नाकावर टिच्चून बोर्ड झळकले

मुंबई : सध्या संपूर्ण देशात पेट्रोल दरांवरुन मोठा गोंधळ सुरु आहे. विरोधकांकडून यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर पेट्रोल दरावरुन नेटीझन्सकडूनही मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यातच कर्नाटककडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे.

कारण, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात येत आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निप्पाणी जवळच्या एका पेट्रोलपंप चालकाने अशाप्रकारचे फलक लावले आहेत सोशल मीडियातूनही यावरुन चांगलीच चर्चा रंगत आहे.

सध्या देशात पेट्रोल दरावरुन वातावरण तापलेलं असताना, दुसरीकडे राज्य सरकारने इंधनावर 11 रुपये अतिरिक्त कर लावला. त्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर अजून वाढले आहेत. पण कर्नाटक सीमेवरील निप्पाणीतील पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त दरात पेट्रोल उपल्बध अशा आशयाचे फलक लावले आहेत. त्यामुळे हे फलक लावून महाराष्ट्रातील जनतेला डिवचल्याची भावना व्यक्त होत आहे.

सध्या मुंबईत पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा गाठला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात दुष्काळी कराचा समावेश करुन सरासरी 75 रुपयानी पेट्रोल मिळत आहे. यातील 11 रुपये कमी झाले, तर फक्त 64 रुपयाने तुम्हाला पेट्रोल मिळू शकेल, अशी भावना महाराष्ट्रात आहे.

पण, त्यातच कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल दराचे फलक लावण्यात आल्याने महाराष्ट्रातील जनतेला खिजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या फलकांमध्ये महाराष्ट्रापेक्षा 3.50 रुपये कमी दराने डिझेल, तर 9 रुपये कमी दराने पेट्रोल मिळेल असं सांगितलं जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील निप्पाणीतील लक्ष्मी ट्रेडीग कंपनी या पेट्रोल वितरकाने याबाबतचे फलक महामार्गावर लावले आहेत.

संबंधित बातम्या

महाराष्ट्र तुडुंब असताना पेट्रोलवर 11 रुपये दुष्काळ कर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV