बीडमधील अंबाजोगाईमध्ये चिअर्स गर्ल्सचा जलवा

सध्या बीडमध्ये एपीएल म्हणजेच अंबाजोगाई प्रिमियर लिगची धूम सुरू आहे. अर्थात या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बॅट्समन आणि बोलर्सपेक्षा वेगळ्याच पाहुण्यांची जास्त चर्चा आहे.

बीडमधील अंबाजोगाईमध्ये चिअर्स गर्ल्सचा जलवा

बीड : सध्या बीडमध्ये एपीएल म्हणजेच अंबाजोगाई प्रिमियर लिगची धूम सुरू आहे. अर्थात या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बॅट्समन आणि बोलर्सपेक्षा वेगळ्याच पाहुण्यांची जास्त चर्चा आहे.

आयपीएलच्या धर्तीवर आता गावागावतल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्येही चिअर्स गर्ल्सचा जलवा पाहायला मिळतो आहे. बीडमध्ये एपीएल अर्थात अंबाजोगाई प्रिमियर लीग दणक्यात सुरु आहे. ही क्रिकेट टुर्नामेंट पाहण्यासाठी आजूबाजबूच्या गावातली तरूणाई गोळा होते.

कारण, या टुर्नामेंटमध्ये चिअर्स गर्ल्सनी चक्क मराठी गाण्यावर ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे, खिशातले 30 रुपये मोजून मंडळी मॅच पाहण्यासाठी येत आहेत.

बॅट्समननं चौकार किंवा षटकार मारताच प्रेक्षकांचा एकच कल्ला होतो. हा कल्ला बॅट्समनला दाद देण्यासाठी कमी आणि चिअर्स गर्ल्सच्या डान्सला प्रतिसाद देण्यासाठी जास्त दिसतो.

चिअर्स गर्ल्सच्या हजेरीमुळं अंबाजोगाईतल्या क्रिकेट टुर्नामेंटला मोठ्या इव्हेन्टचं रूप मिळाल्याचं आयोजक सांगतात..

आतापर्यंत फक्त आयपीएलच्या सामन्यादरम्यान टीव्ही स्क्रीनवर चिअर गर्ल्सचं दर्शन घेणाऱ्या अंबाजोगाईच्या तरुणांना, एपीएलच्या निमित्तानं याची देही याची डोळा चिअर गर्ल पाहायला मिळाल्या. त्यामुळं सध्या बीडमध्ये एपील जरा जास्तच चर्चेत आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: cheer girls atraction on beed apl latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV