52 तास सलग स्वयंपाक, शेफ विष्णू मनोहर विश्वविक्रमाच्या तयारीत

By: रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर | Last Updated: Friday, 21 April 2017 1:46 PM
52 तास सलग स्वयंपाक, शेफ विष्णू मनोहर विश्वविक्रमाच्या तयारीत

नागपूर : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग 52 तास स्वयंपाक करण्याच्या विक्रमाला नागपुरात सुरुवात झाली आहे. जागतिक विक्रम रचण्यासाठी तीन दिवस ते सलग खाद्यपदार्थ बनवणार आहेत.

मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिन‌िअर्स येथे शुक्रवारी मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात विष्‍णू मनोहर हे सलग 52 तासांत एक हजारापेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करुन विश्वविक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न करतील.

यापूर्वी 40 तास सलग स्वयंपाक करण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला आहे. 12 मार्च 2014 रोजी 40 तास कुकिंगचा विक्रम अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांनी नोंदवला आहे. विष्णू मनोहर हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न नागपुरात करतील.

शुक्रवारी 21 एप्रिलला सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. 23 एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा खाद्यपदा‌र्थांचा उत्सव चालणार आहे. या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले जातील. केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील असतील.

First Published: Friday, 21 April 2017 1:46 PM

Related Stories

एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेला भरघोस प्रतिसाद
एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेला भरघोस प्रतिसाद

मुंबई : ‘एबीपी माझा’च्या हुंडाविरोधी परिषदेला राज्यभरातून

तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन महिने उलटणार?
तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन महिने उलटणार?

मुंबई : फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने

नवी मुंबईत शिवसेनेचं नाराजीनाट्य, 20 नगरसेवकांचं राजीनामास्त्र
नवी मुंबईत शिवसेनेचं नाराजीनाट्य, 20 नगरसेवकांचं राजीनामास्त्र

नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई शिवसेनेत

वर्ध्यात झारखंडमधील सात अल्पवयीन मुलं ताब्यात, चाईल्ड ट्रॅफिकिंगचा संशय
वर्ध्यात झारखंडमधील सात अल्पवयीन मुलं ताब्यात, चाईल्ड...

वर्धा : सात अल्पवयीन मुलांना झारखंडमधून सुरतमध्ये घेऊन जात

शेतातील बांधावर विवाह, नवरा-नवरीसह वऱ्हाडींचं श्रमदान
शेतातील बांधावर विवाह, नवरा-नवरीसह वऱ्हाडींचं श्रमदान

वाशिम : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिममधल्या एका गावात

गोंदियात गर्भवतीची पतीकडून कुऱ्हाडीने वार करुन हत्या
गोंदियात गर्भवतीची पतीकडून कुऱ्हाडीने वार करुन हत्या

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा गावात घरघुती वादातून पतीने

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मेगाप्लॅन
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मेगाप्लॅन

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वर शिवसेना

GST साठी 17 मे रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
GST साठी 17 मे रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी

अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, प्रशासन हादरलं!
अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, प्रशासन हादरलं!

बुलडाणा : महावितरणबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारी गांभिर्याने घेत

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017 1. हुंड्याविरोधात हुंकार,