नागपूरमध्ये संपावर गेलेले 17 बस चालक-वाहक बडतर्फ

नागपूर पालिका बससेवेतील चालक आणि वाहकांच्या संपामुळे नागपूरकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान मेस्माअंतर्गत कारवाई करत प्रशासनाने 17 वाहक आणि चालकांना कामावरुन बडतर्फ केलं आहे. यात कामगार सेनेचे सचिव अंबादास शेंडे यांचाही समावेश आहे.

नागपूरमध्ये संपावर गेलेले 17 बस चालक-वाहक बडतर्फ

नागपूर : नागपूर पालिका बससेवेतील चालक आणि वाहकांच्या संपामुळे नागपूरकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान मेस्माअंतर्गत कारवाई करत प्रशासनाने 17 वाहक आणि चालकांना कामावरुन बडतर्फ केलं आहे. यात कामगार सेनेचे सचिव अंबादास शेंडे यांचाही  समावेश आहे.

नागपूर महापालिकेची आपली बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आज सकाळी प्रशासन आणि पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. शहरातील यशवंत स्टेडियमजवळील डेपोमधून पोलिसांच्या बंदोबस्तात बस बाहेर काढल्या. मात्र भारतीय कामगार सेनेनं संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. तसंच मेस्माविरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे.

नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेचे चालक आणि वाहक कालपासून संपावर आहेत. त्यामुळे नागपूरकरांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. काल मेस्मा लागू झाल्यानंतर अनेक चालक आणि वाहक आज सकाळी डेपोत पोहोचले. दरम्यान भारतीय कामगार सेनेचे नेते संपावर ठाम आहेत.

दरम्यान पोलिसांनी बस सेवेत आडकाठी करणाऱ्या आणि संपावर ठाम असलेल्या संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेणं सुरु केलं आहे.

महापालिका बस सेवेच्या चालक वाहकांच्या संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे आज सकाळी हाल झाले. आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. त्यात बस सेवा बंद असल्याने नागपूरकरांना कालपासून त्रासही सहन करावा लागला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: city bus starting in police protection in nagpur latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV