'मी मुख्यमंत्री बोलतोय', फडणवीसांचा शेतकऱ्यांशी संवाद

'मी मुख्यमंत्री बोलतोय', फडणवीसांचा शेतकऱ्यांशी संवाद

मुंबई : मुख्यमंत्र्यांना जनतेशी संवाद साधता यावा, म्हणून 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम टीव्हीवर सुरु होत आहे. आजपासून दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता डीडी सह्याद्री वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

'संकल्प शाश्वत शेतीचा' या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांकडून व्हॉट्सअॅप आणि ईमेलच्या माध्यमातून प्रश्न मागवण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या काही निवडक शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला आहे.

राज्यातल्या 30 शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारता आले. पंतप्रधान नरेंद मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतील.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा विशेष कार्यक्रम


गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन विरोधक आणि शिवसेना भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही करत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून सरकारला टार्गेट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार होऊ नये यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद  साधण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :


तीन दिवसात कर्जमाफीबाबत निर्णय घ्या, अन्यथा… : अजित पवार


…तर शेतकरीच फडणवीस सरकारला इंगा दाखवेल : शरद पवार


यूपीत कर्जमाफी, महाराष्ट्रात कधी? मुनगंटीवार आणि शेट्टींची प्रतिक्रिया


ज्योतिबा फुले जयंतीपासून आसूड यात्रा, आ. बच्चू कडू रस्त्यावर उतरणार!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV