मुख्यमंत्री-अमित शांहाची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा - सूत्र

अंतिम निर्णयासाठी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री-अमित शांहाची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा - सूत्र

अहमदाबाद/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. अंतिम निर्णयासाठी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची आज (सोमवार) संध्याकाळी 6 वाजता भेट घेतली. दोघांमध्येही याबाबतच चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

मोदींसोबत होणाऱ्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. कुणाची गच्छंती होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याचा निर्णय 28 नोव्हेंबरच्या बैठकीत होऊ शकतो. गुजरात निवडणुकीनंतर ही बैठक ठरवण्यात आली आहे.

दरम्यान या बैठकीत केवळ गुजरात निवडणुकीवरच चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील कार्यकर्त्यांच्या भावना अमित शाहांपर्यंत पोहोचवल्या. गुजरातमध्ये प्रचारासाठी येणार आहे, असं त्यांनी बैठकीनंतर सांगितलं.

संबंधित बातमी : राणे आणि मुख्यमंत्र्यांची भेट, विधान परिषद पोटनिवडणुकीवर चर्चा?


 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: cm fadnavis and amit shah meeting regarding state cabinet reshuffle says sources
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV