'शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्यांनाच कर्जमाफी!'

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार, असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

By: | Last Updated: > Sunday, 16 July 2017 1:36 PM
cm fadnvis on farmers loan waiver issue

मुंबई : शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार, असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी 15 जिल्ह्यात चार हजार कोटीचे प्रकल्प उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या क्रार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. तसेच कर्जमाफी संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली.

शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री म्हणाले की, ”ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीनंतर नव्याने पीक कर्ज घेणाऱ्यासाठी सवलतीच्या दरात ते उपलब्ध करुन देऊ,” असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, ”शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 15 जिल्ह्यांत चार हजार कोटीचा प्रकल्प उभारणार आहोत. याशिवाय

यांत्रिकीकरणातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर ही तयार करणार’,” असं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमाचा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीनं 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली होती.

तसेच कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. याचाच पुनरुच्चा आजच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:cm fadnvis on farmers loan waiver issue
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान

रायगड : बहुतांश व्हॉट्सअॅप ग्रुपवर मित्र-मैत्रिणींच्या गप्पा,

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड
छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017   मान्सून जुलैअखेर 10

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात
मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा… आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक

मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार

मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी

कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया
'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय… फक्त 90.. कदमांच्या