VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

बुलडाण्यातील पऱ्हाड कोचिंग क्लासेसमध्ये क्षुल्लक वादावरुन दहावीतील विद्यार्थ्याला तेथील कर्मचाऱ्यानं लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

बुलडाणा :  बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या पऱ्हाड कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यानंच ही मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

कर्मचाऱ्यानंच मारहाण केल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भावेश पाटील असं मारहाण करण्यात आलेल्या दहावीतल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर भावेशला मारहाण करणाऱ्या पऱ्हाड कोचिंग क्लासेसचा कर्मचारी संतोष डोंगरदिवे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पऱ्हाड यांच्या कोचिंग क्लासेसचं इथेच निवासी हॉस्टेल देखील आहे. तिथे भावेश राहत होता. ८ सप्टेंबरच्या रात्री भावेश आणि संतोष यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यानंतर संतोषने भावेशला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. मात्र, या संपूर्ण प्रकारावर भावेशच्या कुटुंबीयांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, ही संपूर्ण मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या बुलडाण्यामध्ये बराच व्हायरल झाला आहे.

VIDEO :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV