राज्यात थंडीचा जोर वाढला, परभणीत तापमानाचा पारा 6 अंश सेल्सिअसवर

राज्यात तापमानाचा पारा कमालीचा खाली जाताना दिसतो आहे. परभणीचं आजचं किमान तापमान तर चक्क 6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तर दुसरीकडे नागपूर आणि पुण्यात आजचं किमान तापमान 9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.

By: | Last Updated: 20 Dec 2017 01:02 PM
राज्यात थंडीचा जोर वाढला, परभणीत तापमानाचा पारा 6 अंश सेल्सिअसवर

 

मुंबई : राज्यात तापमानाचा पारा कमालीचा खाली जाताना दिसतो आहे. परभणीचं आजचं किमान तापमान तर चक्क 6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तर दुसरीकडे नागपूर आणि पुण्यात आजचं किमान तापमान 9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.

राज्याची राजधानी मुंबईचं आजचं तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं होतं. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरचा पारा 11 अंशांपर्यंत खाली आला.

नांदेड आणि वाशिममध्येही 10 अंशांपर्यंत तापमान खाली घसरलं. तर जळगाव, अकोला अमरावती या जिल्हयांमध्ये पारा 14 अंशांवर आला.

राज्याच्य़ा बहुतांश भागाला थंडीनं हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुकं पडलेलं बघायला मिळतं आहे. ठिकठिकाणी पहाटे आणि भल्या सकाळी लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: lowest temprea
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV