लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक, वीरपत्नी उद्यापासून देशसेवेत!

पत्नीच्या निधनानंतर वीरपत्नी स्वाती महाडिक यांच्या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक, वीरपत्नी उद्यापासून देशसेवेत!

सातारा : अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नींची जिद्द अखेर कामी आल्याचं चित्र दिसत आहे. शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक उद्यापासून देशसेवेत रुजू होत आहेत.

कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. पतीचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करत, देशसेवेसाठी संधी मिळण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते.

त्यांच्या निर्धाराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी चेन्नईत एक वर्ष अथक प्रयत्न केले. त्यांनी खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. स्वाती महाडिक उद्या लेफ्टनंट पदाची शपथ घेणार आहेत.

पतीच्या निधनानंतर वीरपत्नी स्वाती महाडिक यांच्या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

पुणे विद्यापीठातून पदवी
स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना मिलिट्रीमध्ये दाखल होण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली. त्यांचा देशसेवेचा दृढ निश्चय आणि समाजाप्रती बांधिलकी पाहून, आम्हाला प्रभावित केलं, असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

चेन्नईत खडतर ट्रेनिंग
चेन्नईत मिलिट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वाती यांच्यासोबतचे सर्व उमेदवार हे किमान 10 वर्षांनी लहान होते. त्यामुळे स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावं लागलं.

पतीच्या पार्थिवावर देशसेवाचा निर्धार
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. मात्र त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला होता.

संबंधित बातम्या

लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक, वीरपत्नी उद्यापासून देशसेवेत!

सातारा सैनिक स्कूलच्या स्टेडियमला शहीद महाडिकांचं नाव

देखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त!

शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस

शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

‘माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील’ वीरपत्नीचा निर्धार

शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन

शहिदांच्या कुटुंबियांबाबत उदयनराजे म्हणतात…

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV