वाढदिवस साजरा करताना औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाचा धांगडधिंगा

औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाने वाढदिवस साजरा करताना ओंगाळवाणं प्रदर्शन केलं. ज्याचा नागरिकांनाही त्रास झाला.

वाढदिवस साजरा करताना औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाचा धांगडधिंगा

औरंगाबाद : वाढदिवस कुणी कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाने वाढदिवस साजरा करताना ओंगाळवाणं प्रदर्शन केलं. ज्याचा नागरिकांनाही त्रास झाला.

नगरसेवक अफसर खान यांनी बेगमपुरा भागातील भर रस्त्यात एक स्टेज उभारलं. या स्टेजवर त्यांनी ‘मैं हूँ डॉन’ गाणं लावून डान्स केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःवर पैशांचाही पाऊस पाडून घेतला. ऑर्केस्ट्रा लावून यावेळी नृत्य करण्यात आलं.

aur nagarsevak afsar khan 1

धक्कादायक म्हणजे, यावेळी पोलीस अधिकारीही उपस्थित असल्याची माहीती आहे. त्यावर पोलसांनी कुठलाही गुन्हा नोंद केला नाही हे विशेष म्हणता येईल. 30 तारखेच्या रात्री हा सर्व प्रकार झाला घडला. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

कोण आहे अफसर खान?

अफसर खान हे औरंगाबाद महापालिकेतील बेगमपुरा भागातील काँग्रेसचे नगरसेवक आहेत. 22 वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. त्यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल आहे. राजकारणात येण्यापूर्वी अफसर खान सिनेमागृहाबाहेर ब्लॅकने तिकीट विक्री करायचे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Congress corporator creates law and order situation in Aurangabad while during his birthday celibration
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV