..तेव्हाच अशोक चव्हाणांनी पटोलेंना ऑफर दिली होती!

नाना पटोले यांना गेल्या महिन्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती.

By: | Last Updated: 08 Dec 2017 02:53 PM
..तेव्हाच अशोक चव्हाणांनी पटोलेंना ऑफर दिली होती!

नागपूर: भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. मात्र  नाना पटोले यांना गेल्या महिन्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली  होती.

भाजपमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये यावं, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. 7 नोव्हेंबरला काँग्रेसने अमरावतीत विभागीय जनआक्रोश मेळावा घेतला होता. यावेळी चव्हाण यांनी पटोलेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर केली होती.

भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा

भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन, त्याबाबत अधिकृत घोषणा करतील. मात्र त्यापूर्वी त्यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा सोपवला.

नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती.

शेतकरी प्रश्नावरुन त्यांनी अनेकवेळा सरकारविरोधी भूमिका घेतली होती. नुकतंच भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनासाठी नाना पटोले यांनीच सिन्हांना हाक दिली होती.

राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/939039327736098816

https://twitter.com/NANA_PATOLE/status/939039327736098816

संबंधित बातम्या

भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा

काँग्रेसमध्ये या, अशोक चव्हाणांची नाना पटोलेंना जाहीर ऑफर

‘सरकार आंधळं आणि बहिरं’, नाना पटोलेंची घणाघाती टीका

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Congress offers to Nana Patole
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV