दहावीत कलेच्या गुणांमध्ये कपात, शिक्षण खात्याचा नवा नियम

चित्रकलेसाठी पूर्वी २५ गुण देण्यात येत होते. आता नव्या नियमानुसार जास्तीत जास्त १५ गुण देण्यात येणार आहेत.

दहावीत कलेच्या गुणांमध्ये कपात, शिक्षण खात्याचा नवा नियम

मुंबई : राज्य सरकारने दहावीच्या परीक्षेत दिल्या जाणाऱ्या कलेच्या गुणांमध्ये बदल केले आहेत. याआधी चित्रकलेसाठी २५ गुण देण्यात येत होते. आता नव्या नियमानुसार जास्तीत जास्त १५ गुण देण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी सर्वाधिक गुण चित्रकलेच्या परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना मिळाले होते. यावर्षीपासून चित्रकलेच्या गुणांचे नियमही कडक करण्यात आले आहेत. तसंच लोककलेचाही या गुणांमध्ये आता समावेश करण्यात आला आहे.

तसेच हे गुण मिळवणाऱ्यांसाठी अकरावी प्रवेशात २ टक्के गुण राखीव ठेवण्याचा नियमही रद्द करण्यात आला आहे.

25 गुणांऐवजी कसे  मिळतील गुण यावर एक नजर :- नव्या निर्णयानुसार, शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादनात तिसरी आणि पाचवी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातील.


- यासाठी सांस्कृतिक कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधूनच परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे


- चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या बालकलाकारास दहा गुण, तर राज्य स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला पाच गुण अतिरिक्त दिले जातील.


- प्रयोगात्मक लोककलेसाठी अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना शिक्षण विभागाने सांस्कृतिक विभागाला केली आहे.


- या अभ्यासक्रमानुसार गुणदान ठरवले जाणार आहे.


- चित्रकला परीक्षेत अ श्रेणी मिळाल्यास सात गुण, ब श्रेणीसाठी पाच गुण, क श्रेणीसाठी तीन गुण दिले जातील.


- लोककलेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या संख्येनुसार गुण दिले जाणार आहेत.


- त्यानुसार पंचवीस ते एकूणपन्नास प्रयोग केलेल्या विद्यार्थ्यांना पाच गुण, पन्नासपेक्षा जास्त प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातील.महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: cuts extra marks for arts and culture in SSC latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV