'घाटाचा राजा'च्या स्मरणार्थ खोपोली ते खंडाळा सायकल राईड

मुंबई-पुणे सायकल शर्यत गाजवणा-या आणि 'घाटाचा राजा' असा लौकिक असलेले सायकलपटू अशोक खळे यांचं काही दिवसांपूर्वीच सायकलिंग करताना टॅक्सीने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला.

'घाटाचा राजा'च्या स्मरणार्थ खोपोली ते खंडाळा सायकल राईड

रायगड : 'घाटाचा राजा' अर्थात दिवंगत अशोक खळेंच्या स्मरणार्थ 'खोपोली ते खंडाळा' घाटात सायकल राईड आयोजित करण्यात आली आहे. या सायकल राईडला सकाळी सुरुवात झाली.

मुंबई-पुणे सायकल शर्यत गाजवणा-या आणि 'घाटाचा राजा' असा लौकिक असलेले सायकलपटू अशोक खळे यांचं काही दिवसांपूर्वीच सायकलिंग करताना टॅक्सीने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'खोपोली ते खंडाळा' घाटात सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर सायकलस्वार या राईडमध्ये सहभागी झाले आहेत.

सायकलस्वार हे देखील वाहतुकीचा भाग असून त्यांना देखील रस्ता उपलब्ध करुन देणं ही इतर वाहनांची जबाबदारी आहे. प्रत्येक सायकलस्वाराने रहदारीच्या रस्त्यांवर जबाबदारीने सायकलिंग करणं गरजेचं आहे. हे पटवून सांगण्यासाठी या राईडच आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Cycle ride on khopoli to khandala ghat latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Cycle Ride सायकल राईड
First Published:

Related Stories

LiveTV