VIDEO : परतीच्या पावसामुळे ‘गोदावरी’वरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला!

कोपरगाव तालुक्यातील मंजूरमध्ये गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईपचा बंधारा आहे.

VIDEO : परतीच्या पावसामुळे ‘गोदावरी’वरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला!

अहमदनगर : परतीच्या पावसामुळं अहमदनगरच्या मंजूर गावातील गोदावरी नदीवरच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे. कोपरगाव तालुक्यातील मंजूरमध्ये गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईपचा बंधारा आहे.

सध्या नाशिकमध्ये सुरु असलेल्या पावसामुळं गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. पाण्याचा जोर वाढल्यानं या बंधाऱ्याच्या उजव्या बाजूला असलेला मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे गोदावरीचं पाणी परिसातील शेतीत घुसल्यानं मोठं नुकसान झालं आहे. तसेच हा भराव वाहून नदीपलीकडच्या गावात ये-जा करण्यांचाही मार्ग बंद झाला आहे.

गेल्या दोन वर्षापूर्वीही अशाच प्रकार हा बंधारा वाहून गेला होता. त्यामुळे आता येथे माती न टाकता सिमेंट बांधकाम करण्याची मागणी नागरिकांककडून केली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV