गडावर नव्हे, संत भगवान बाबांच्या जन्मभूमीवर दसरा मेळावा होणार?

यंदाचा मेळावा गडावर नव्हे, तर संत भगवान बाबा यांचं जन्म गाव असलेल्या सावरगावात होण्याची शक्यता आहे. यावर सकारात्मक निर्णय सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गडावर नव्हे, संत भगवान बाबांच्या जन्मभूमीवर दसरा मेळावा होणार?

औरंगाबाद/बीड : भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत होण्याची चिन्ह आहेत. कारण यंदाचा मेळावा गडावर नव्हे, तर संत भगवान बाबा यांचं जन्म गाव असलेल्या सावरगावात होण्याची शक्यता आहे. यावर सकारात्मक निर्णय सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सावरगाव हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे. या गावामध्ये यावर्षी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सप्ताहासाठीही हजेरी लावली होती. गावकऱ्यांनी दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर आता गडाऐवजी भगवान बाबांच्या जन्मभूमीतच दसरा मेळावा होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

भगवानगडावर दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली

पंकजा मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.

पंकजा मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्रींना पत्र लिहून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

भगवानगड दसरा मेळाव्याला जिल्हा प्रशासनानेही परवानगी नाकारली!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV