पोलीस भरती सरावादरम्यान युवतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना 20 वर्षीय युवतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगलीतील विटा शहरात घडली.

पोलीस भरती सरावादरम्यान युवतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सांगली : पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना 20 वर्षीय युवतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगलीतील विटा शहरात घडली. कोमल दत्तात्रय पवार असं या युवतीचे नाव आहे. विटामधील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

बळवंत महाविद्यालयाच्या जवळील सुळेवाडी हे कोमलचे गाव. कोमल बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तसंच सध्या ती पोलीस भरतीसाठी मैदानी सरावही करायची.

आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सरावादरम्यान अचानक कोमलला चक्कर आली आणि ती थेट मैदानावरच कोसळली. मैदानावर सराव करणाऱ्या अन्य खेळाडूंनी तिला तात्काळ उपचारासाठी विटामधील यशश्री रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. कोमलच्या आकस्मिक मृत्यूने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Death of a 20 year old girl with a heart attack latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV