अहमदनगरमध्ये दोन गटात हाणामारी, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

अहमदनगरमधील पाथर्डीत अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाणीत मध्यस्थी करायला गेलेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सचिन पवार असं मृत तरूणाचं नाव आहे.

अहमदनगरमध्ये दोन गटात हाणामारी, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगरमधील पाथर्डीत अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाणीत मध्यस्थी करायला गेलेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सचिन पवार असं मृत तरूणाचं नाव आहे.

बुधवारी अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी सचिन पवार त्या दोन गटात मध्यस्थी करण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी सचिनच्या डोक्यातही लाकडी दांडके आणि दगडानं हल्ला करण्यात आला होता.

यानंतर गंभीर जखमी झालेल्या सचिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शुक्रवारी पहाटे सचिनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सचिनच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तौनात ठेवला होता.

दुसरीकडे सचिनच्या नातेवाईकांनीही या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV