सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत कोथळे या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू

सांगली : सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत कोथळे या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, जबरदस्ती करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. यातील अनिकेत कोथळेवर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापरल्यामुळे, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

विशेष म्हणजे, पोलिसांकडून या दोन्ही आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक केली गेली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढचा तपास सीआयडीकडे दिला जाणार आहे. पण या घटनेमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: death of the youth by the third degree of Sangli police
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV