स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याची ताकदही राणेंमध्ये नाही : केसरकर

ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व असल्याचा नारायण राणे यांचा दावा खोटा आहे, असं म्हणत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याची ताकदही राणेंमध्ये नाही : केसरकर

मुंबई : ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व असल्याचा नारायण राणे यांचा दावा खोटा आहे, असं म्हणत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे. सरपंच सोडा, मुलाला निवडणूक आणण्याची ताकदही राणेंमध्ये नाही, असं केसरकर म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नुकत्याच स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्व असल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. त्याला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी राणेंवर हल्लाबोल केला.

राणेंचं चारित्र्य मला माहिती आहे, मी अद्याप सोज्वळता सोडली नाही म्हणून बोलत नाही. राणेंच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, अशी जहरी टीका दीपक केसरकर यांनी केली.

नारायण राणे यांनी भाजपवर केलेले आरोप भाजपा विसरलेली दिसत आहे. नारायण राणे यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता नाही, हे भाजपने जाहीर करावं आणि राणेंना भाजपात घ्यावं, असं आव्हान देत दीपक केसरकर भाजपवरही टीकास्त्र सोडलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: deepak kesarkar on narayan rane over grampanchayat election result
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV