सिंदखेड राजामधील सभेसाठी केजरीवाल औरंगाबादेत दाखल

औरंगाबाद विमानतळावर आप कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

सिंदखेड राजामधील सभेसाठी केजरीवाल औरंगाबादेत दाखल

औरंगाबाद : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे होणाऱ्या सभेनिमित्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल औरंगाबादेत दाखल झाले. औरंगाबाद विमानतळावर आप कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे आता उद्याच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा रोडवरील भगवानबाबा महाविद्यालयाच्या मैदानावर केजरीवालांची सभा होणार असल्याची माहिती आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीला केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी केजरीवालांच्या सभेला परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता उद्या केजरीवालांच्या सभेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Delhi CM arvind kejariwal reaches at Aur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV