VIDEO : जेव्हा श्री आणि सौ मुख्यमंत्री अभिनय करतात!

जलसंवर्धनाचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्या पत्नी अमृता यांच्यासोबत थेट गायकीच्या क्षेत्रात उतरले आहेत.

VIDEO : जेव्हा श्री आणि सौ मुख्यमंत्री अभिनय करतात!

मुंबई : जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, नद्यांचं संवर्धन यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारचं जलसंवर्धन आणि अन्य कामं आपण पाहिलं. पण सरकारचं हेच काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्या पत्नी अमृता यांच्यासोबत थेट गायकीच्या क्षेत्रात उतरले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनीही आपली हौस भागवून घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

आतापर्यंत फडणवीस सरकारने आपली कामं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्रीच गाण्याच्या माध्यमातून जनतेसमोर आले आहेत.

दरम्यान, या व्हिडीओबाबत सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

VIDEO : 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: devendra fadnavis and amruta fadnavis acting for advertisement latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV