धनंजय मुंडेंनी स्वतः उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला

वर्ध्यातल्या पवनार गावात नेत्यांसमोरच शेतकऱ्याने कापसावर ट्रॅक्टर फिरवण्याचा प्रयत्न केला.

धनंजय मुंडेंनी स्वतः उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला

वर्धा : बोंडअळीने कापूस उत्पादक किती हैराण आहेत, याची प्रचिती आज राष्ट्रवादीच्या नेत्यांना आली. वर्ध्यातल्या पवनार गावात नेत्यांसमोरच शेतकऱ्याने कापसावर ट्रॅक्टर फिरवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनवणी करुनही शेतकऱ्यांनी ऐकलं नाही. उलट त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनाच ट्रॅक्टरवर बसवलं आणि त्यांनाच कापसावर ट्रॅक्टर चालवायला सांगितलं.

बोंडअळीमुळे कापूस उत्पादक हैराण झालेला असताना सरकार मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. आपणही शेतकऱ्याचाच मुलगा असून उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवणं हे वेदनादायी असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: dhananjay munde tractor driving in Wardha pavnar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV