काँग्रेस आमदार अमरिश पटेल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

मात्र, धुळे जिल्ह्यात एकाच वेळी दोन नेत्यांच्या घरी छापेमारी सुरु झाल्याने राजकीय आणि उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे.

काँग्रेस आमदार अमरिश पटेल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

धुळे : धुळे आणि शिरपूरमध्ये आयकर विभागाने छापा टाकला. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि उद्योजक अमरिश पटेल तसंच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली.

उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारीप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी  काही राजकीय नेत्यांच्या तसंच व्यापारी आणि उद्योजकांच्या निवासस्थानी, कंपन्यांची आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे.

Dhule_Raid

आयकर विभागाने राजवर्धन कदमबांडे यांच्या धुळ्यातील तर अमरिश पटेल यांच्या शिरपूर इथल्या निवासस्थानी आज सकाळी 9 च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या चौकशी पथकात सुमारे 25 पेक्षा अधिक सदस्य आहेत.

मात्र, धुळे जिल्ह्यात एकाच वेळी दोन नेत्यांच्या घरी छापेमारी सुरु झाल्याने राजकीय आणि उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dhule : IT raids at Congress MLC Amrish Patel’s house
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV