18 ऑक्टोबरपासून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात : मुख्यमंत्री

कर्जमाफी योजना जाहीर करुनही अद्याप लाभ न मिळाल्याने सरकारवर चौफेर टीका सुरु होती. मात्र दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफीचा लाभ दिल्याने कर्जाच्या ओझाखाली जगणाऱ्या बळीराजाची दिवाळी आनंदाने साजरी होणार आहे.

18 ऑक्टोबरपासून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात : मुख्यमंत्री

जालना : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 18 ऑक्टोबरपासून मिळणार आहे. ज्यांनी निकष पूर्ण केले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे 18 ऑक्टोबरपासून जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा


जालना दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. कर्जमाफी योजना जाहीर करुनही अद्याप लाभ न मिळाल्याने सरकारवर चौफेर टीका सुरु होती. मात्र दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफीचा लाभ दिल्याने कर्जाच्या ओझाखाली जगणाऱ्या बळीराजाची दिवाळी आनंदाने साजरी होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/919914988159909888

https://twitter.com/raosahebdanve/status/919913755244244994

https://twitter.com/raosahebdanve/status/919915242154373121

राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी

राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना

राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे.

दिनांक  1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी खास योजना

दीड लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र थकबाकी रकमेच्या 25 टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 2012 – 2013 ते 2015 – 2016 या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, परंतु 30 जून 2016 रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल.


‘यांना’ कर्जमाफीतून वगळलं!

 राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. करदाते आणि व्हॅट भरणारे व्यापाऱ्यांनाही कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी?

अहमदनगर – 2 लाख 869

औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322

बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818

गडचिरोली – 29 हजार 128

जळगाव – 1 लाख 94 हजार 320

लातूर – 80 हजार 473

नागपूर – 84 हजार 645

नाशिक – 1 लाख 36 हजार 569

परभणी – 1 लाख 63 हजार 760

रत्नागिरी – 41 हजार 261

सिंधुदुर्ग – 24 हजार 447

वाशिम – 45 हजार 417

अकोला – 1 लाख 11 हजार 625

बीड – 2 लाख 8 हजार 480

चंद्रपूर – 99 हजार 742

गोंदिया – 68 हजार 290

जालना – 1 लाख 96 हजार 463

मुंबई शहर – 694

मुंबई उपनगरे – 119

नांदेड – 1 लाख 56 हजार 849

उस्मानाबाद – 74 हजार 420

पुणे – 1 लाख 83 हजार 209

सांगली – 89 हजार 575

सोलापूर – 1 लाख 8 हजार 533

यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471

अमरावती – 1 लाख 72 हजार 760

भंडारा – 42 हजार 872

धुळे – 75 हजार 174

हिंगोली – 55 हजार 165

कोल्हापूर – 80 हजार 944

नंदुरबार – 33 हजार 556

पालघर – 918

रायगड – 10 हजार 809

सातारा – 76 हजार 18

ठाणे – 23 हजार 505

..म्हणून आकडेवारीत वर्ध्याचं नाव नाही!

मुख्यमंत्री कार्यलायने ट्विटरवरुन कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर केली. मात्र यात वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही. यासंदर्भात एबीपी माझाने वर्ध्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली असता, असे लक्षात आले की, सुधारित सर्क्युलर आल्यावर वर्ध्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार होईल.

जिल्हा बँकेच्या एप्रिल 2012 ते जून 2017 पर्यंत दीड लाख रुपयांच्या घरात असणारे जवळपास 4 हजार 393 शेतकरी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कडू यांनी दिली. तर यात राष्ट्रीय बँकांची आकडेवारी अद्याप तयार झालेली नसल्याचं जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक वामन कोहाड यांनी सांगितलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV