सुकाणू समितीमध्ये उभी फूट, आजच्या बैठकीला अनेक सदस्यांची अनुपस्थिती

By: | Last Updated: > Saturday, 10 June 2017 10:40 AM
सुकाणू समितीमध्ये उभी फूट, आजच्या बैठकीला अनेक सदस्यांची अनुपस्थिती

नाशिक : शेतकरी आंदोलन सुकाणू समितीत फूट उभी फूट पडल्याचं चित्र आहे. आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनेक सदस्य गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे सुकाणू समितीच्या माध्यमातून सुरु असलेली चर्चा थंडावेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज मुंबईमध्ये सुकाणू समितीची समन्वय समितीशी बैठक होणार आहे. या बैठकीला डॉ.गिरधर पाटील, रामचंद्रबापू पाटील, अनिल घनवट, बुधाजीराव मुळिक आदी सदस्य अनुपस्थित राहणार आहेत. गिरधर पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे.

सर्व सदस्यांना विश्वासात न घेता बैठका, चर्चा सुरू असल्याचा आरोपही गिरधर पाटील यांनी केला आहे. तसंच आज होणाऱ्या बैठकीचा निरोपही पोहचले नाही असा आक्षेपही नोंदवला आहे. सरकारशी बोलण्याची आम्हाला कुठलीही घाई नाही. आधी शेतकऱ्यांवरचे दाखल गुन्हे मागे घ्या, मगच चर्चा करा असा पवित्रा गिरीधर पाटील यांनी घेतला आहे. सरकारशी चर्चेचा राजकीय थिल्लरपणा थांबवण्यासही गिरधर पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकारसोबतच्या चर्चेआधीच सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र समोर आलं आहे.

गिरधर पाटील काय म्हणाले?

सर्वसमावेशक सुकाणू समिती नेमावी, असा आग्रह मी पूर्वीपासून धरल्याचं गिरधर पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसलेंकडून आरोपांवर उत्तर

डॉ. गिरधर पाटील खोट बोलत आहेत. आजच्या बैठकीसाठी आम्ही सगळ्यांना स्वतः फोन केले आहेत, निमंत्रण दिलं आहे असं सांगत सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसले यांनी गिरधर पाटलांवर पलटवार केला आहे.

First Published:

Related Stories

पावसाने पाठ फिरवल्यानंतर भाज्यांच्या दरातही उसळी
पावसाने पाठ फिरवल्यानंतर भाज्यांच्या दरातही उसळी

नवी मुंबई : पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्यानंतर आता भाजीपाल्याच्या

मान्सूनच्या पावसासाठी आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागणार
मान्सूनच्या पावसासाठी आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागणार

पुणे : राज्यात मान्सूनच्या दमदार हजेरीसाठी आणखी 24 तास वाट पाहावी

सविस्तर माहिती : पंतप्रधान पीक विमा योजना
सविस्तर माहिती : पंतप्रधान पीक विमा योजना

पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तलयाने सर्व जिल्ह्यांमध्ये ‘पंतप्रधान

'शेतकरी आंदोलन राजकीय, देवेंद्र विदर्भाचे असल्याने अनेकांच्या पोटात गोळा'
'शेतकरी आंदोलन राजकीय, देवेंद्र विदर्भाचे असल्याने अनेकांच्या...

नागपूर: भाजप जिंकून विदर्भाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

दहा हजार रुपयांचं कर्ज मिळवण्याच्या निकषांमध्ये बदल
दहा हजार रुपयांचं कर्ज मिळवण्याच्या निकषांमध्ये बदल

मुंबई : शेतकऱ्यांना खरीपासाठी 10 हजार रुपयांची मदत देण्याचा जीआर

सातबारा आधार कार्डशी जोडण्याबाबतचं व्हायरल पत्र बोगस, केंद्राचं स्पष्टीकरण
सातबारा आधार कार्डशी जोडण्याबाबतचं व्हायरल पत्र बोगस, केंद्राचं...

नवी दिल्ली : बँक खातं आणि पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या

10 हजार रुपयांचं कर्ज घेताना शपथपत्र देण्याची सक्ती नाही : मुख्यमंत्री
10 हजार रुपयांचं कर्ज घेताना शपथपत्र देण्याची सक्ती नाही :...

पुणे : शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांचं कर्ज देण्यासाठी अटी घातलेल्या

मध्यावधीचा पैसा शेतकऱ्यांना द्या: उद्धव ठाकरे
मध्यावधीचा पैसा शेतकऱ्यांना द्या: उद्धव ठाकरे

बुलडाणा: मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचं म्हणत असाल, तर जो पैसा

10 हजार रुपयांचं कर्ज 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही!
10 हजार रुपयांचं कर्ज 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही!

मुंबई : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज

शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपये कर्ज मिळणार, शासन निर्णय जारी
शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपये कर्ज मिळणार, शासन निर्णय जारी

मुंबई : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज