शेतकऱ्यांवर लाठीकाठी चालली नाही पाहिजे : सदाभाऊ

दोन्ही रुग्ण धोक्याच्या पातळीच्या बाहेर असून, आठ दिवसात सरकारला अहवाल सादर होणार असल्याची माहिती सदाभाऊंनी दिली.

शेतकऱ्यांवर लाठीकाठी चालली नाही पाहिजे : सदाभाऊ

अहमदनगर : शेतकरी अन्नदाता असून शेतकऱ्यांवर लाठीकाठी चालली नाही पाहिजे, असे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. शिवाय, गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई निश्चित करण्याचं अश्वासनही सदाभाऊंनी दिलं. अहमदनगरला गोळीबारातील जखमी शेतकऱ्यांच्या भेटीनंतर ते बोलत होते.

यावेळी बोलताना खोत यांनी गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई निश्चित करण्याचं अश्वासन दिलं.

दोन्ही रुग्ण धोक्याच्या पातळीच्या बाहेर असून, आठ दिवसात सरकारला अहवाल सादर होणार असल्याची माहिती सदाभाऊंनी दिली.

“शेतकऱ्यांची एफआरपी आणि वाढीव रक्कमेची मागणी होती. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी 23 तारखेला कारखाना प्रशासन आणि शेतकर्‍यांची बैठक बोलावली आहे.”, अशी माहिती सदाभाऊंनी दिली.

मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून सक्षम असल्यानं वेगळ्या गृहमंत्र्यांची मागणी सदाभाऊंनी फेटाळून लावली. आंदोलनावेळी चर्चेचा मार्ग खुला असला पाहिजे. कारखानदारांनी वेळेत चर्चा झाली असती तर टळला असता, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Don’t beat farmers, says Sadabhau khot latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV