एकनाथ खडसे-राहुल गांधींची दिल्लीत भेट: सामना

दिल्लीत खडसेंनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

एकनाथ खडसे-राहुल गांधींची दिल्लीत भेट: सामना

नवी दिल्ली: भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्येच जाणार असल्याच्या शक्यतेला दिवसेंदिवस पाठबळ मिळत आहे.

कारण बुधवारी एकनाथ खडसे, काँग्रेस नेते पृथ्वीराच चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी औरंगाबाद ते दिल्ली असा प्रवास एकाच विमानातून केला. त्यापुढची घडामोड म्हणजे, दिल्लीत खडसेंनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सामना या दैनिकाने विश्वसनीय सूत्रांच्या आधारे ही बातमी दिली आहे.

अनेक भाजप नेते आमच्या संपर्कात : पृथ्वीराज चव्हाण


खडसे-गडकरी भेट

दरम्यान, राहुल गांधींच्या भेटीपूर्वी खडसे यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी खडसे यांची कन्या शारदा आणि सून खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

खडसेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, याबाबत खडसेंनी स्पष्टीकरण देताना, पृथ्वीराज चव्हाण आणि मोहन प्रकाश यांची विमानतळावर योगायोगाने भेट झाल्याचं म्हटलं. कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असं खडसे म्हणाले.

काँग्रेस प्रवेशाच्या बातमीचं खंडन
काँग्रेस प्रवेशाच्या बातमीचं एकनाथ खडसे यांनी खंडन केलं. “औरंगाबादमधून मोहन प्रकाश आणि पृथ्वीराज चव्हाणांबरोबर विमान प्रवास केला, हे खरं आहे. दिल्लीत नितीन गडकरींची भेट शहाद्यातल्या साखर कारखान्याच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी घेतली.”, असेही खडसे यांनी सांगितले.

खडसेंची नाराजी

भोसरी जमीन प्रकरणानंतर मंत्रिपदावरुन हटवल्यानंतर एकनाथ खडसेंनी नेहमीच जाहीर व्यासपीठावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यात गेल्या काही दिवसात तर त्यांना काँग्रेसमधूनही पक्षात येण्याच्या जाहीररित्या ऑफर दिल्या गेल्या. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे आणि मोहन प्रकाश यांची भेट झाल्याने चर्चेला एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले आहे.

त्यातच थेट खडसेंनी राहुल गांधींची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे खडसे भाजपला कधी रामराम करणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या

औरंगाबादमध्ये खडसे, मोहन प्रकाश आणि पृथ्वीराज चव्हाणांची भेट  

भाजप सोडण्याचा विचार नाही, पण पर्याय काय?: एकनाथ खडसे

पदर ढळल्यावर ऑफर यायचीच, ‘सामना’तून खडसेंवर वार

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Eknath Khadse met Rahul Gandhi in delhi :source
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV