संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस होतो : खडसे

राज्यासह देशभरात ज्या ज्या ठिकाणी संघाच्या शाखा आहेत. अशा ठिकाणी भाजपाची वाढ झाल्याचा दावाही खडसेंनी केला.

संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस होतो : खडसे

जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त आणि यंत्रणेत एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आरएसएसचे जेष्ठ कार्यकर्ते आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात खडसे बोलत होते.

राज्यासह देशभरात ज्या ज्या ठिकाणी संघाच्या शाखा आहेत. अशा ठिकाणी भाजपाची वाढ झाल्याचा दावाही खडसेंनी केला. शिवाय, भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवरुन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीत वाढलेले बापूराव मांडे यांच्या कार्याने आणि शिस्तीने आपण प्रभावित झालो. त्याच बरोबर अनेक अडचणींच्या काळात त्यांनी आपल्याला केलेले मार्गदर्शन हे आपल्या जीवनात अतिशय मोलाचे ठरले आहे.” असे खडसे यांनी म्हटले.

“1980 च्या अगोदरच्या काळापासून संघाचे कार्य जळगाव जिल्ह्यात बापू मांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केले होते. त्यांच्या शाखांचा विस्तार देखील त्यांनी गावोगावी सुरु केला होता. निस्वार्थपणे नेते घडवले म्हणून हे शक्य झाले. अन्यथा बारामतीतदेखील आपला पक्ष वाढला असता. ज्या ज्या ठिकाणी संघाचे कार्य आणि शाखा वाढल्या, त्या त्या ठिकाणी भाजप पक्ष वाढला.”, असा दावा खडसे यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Eknath Khadse talks on RSS discipline latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV