काँग्रेसमध्ये येणार का? ऑफरला एकनाथ खडसेंचं भावूक उत्तर

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली.

काँग्रेसमध्ये येणार का? ऑफरला एकनाथ खडसेंचं भावूक उत्तर

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पक्षातील घुसमट पुन्हा एकदा समोर आली आहे. निमित्त होतं काँग्रेसने त्यांना दिलेल्या पक्षात येण्याच्या ऑफरचं. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली.

या पक्षासाठी 40 वर्ष काम केलं, मात्र परिस्थिती माणसावर कोणतीही वेळ आणू शकते, असं भावूक उत्तर एकनाथ खडसेंनी दिलं. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत खडसेंची पक्षातील घुसमट समोर आली.

''राज्यात आणखी पशुवैद्यकीय रुग्णालये सुरू होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी आपल्या गावात 100 एकर जागा एका रुग्णालयासाठी मोफत दिली. मात्र अद्याप महाविद्यालय सुरू झालं नाही'', अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी, "असा दिलदार माणूस आमच्या पक्षात येईल का" असं म्हणताच खडसे यांना भावना अनावर झाल्या. ‘येऊ शकतो’, असx सांगतानाच परिस्थिती काय घडवेल सांगता येत नाही. 40 वर्षे पक्ष उभा केला, सरकार आणलं, आता हा पक्ष कसा सोडू शकतो, असx म्हणत त्यांनी स्वतःला सावरलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Eknath khadse’s emotional reply to congress offer
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV