रेल्वेची जोरदार धडक, हत्तीण पुलावरुन खाली कोसळली

रेल्वेने धडक दिल्यामुळे हत्तीण पुलावरुन खाली कोसळली आणि गतप्राण झाली.

रेल्वेची जोरदार धडक, हत्तीण पुलावरुन खाली कोसळली

बेळगाव: रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वेने जोरदार धडक दिल्याने एका हत्तीणीचा मृत्यू झाला आहे. रेल्वेने धडक दिल्यामुळे हत्तीण पुलावरून खाली कोसळली आणि गतप्राण झाली.

गोलिहळ्ळी वनभागाच्या हद्दीतील तावरगट्टी आणि भीषकेनट्टी रेल्वेस्थानका दरम्यान रेल्वे मार्गावर रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

पाच जणांच्या हत्तीच्या कळपातील नऊ वर्षाच्या हत्तीणीचा रेल्वेची धडक लागून डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती खानापूरचे एसीएफ सी.बी.पाटील यांनी दिली.

घटनेची माहिती कळल्यावर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.

घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीची शवचिकित्सा केली. हत्तीचे डोके,पाठ यांना जबर मार बसल्यामुळे हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV