धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली.

धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण

धुळे: संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याच्या घरी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

dharma patil

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालयातच 22 जानेवारीला विषप्राशन केलं. 80 वर्षीय पाटील यांनी विष प्राशन केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

धर्मा पाटील यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला.

सानुग्राह अनुदान नाकारलं

संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 80 वर्षीय आजोबांना 15 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील याने हे अनुदान नाकारलं आहे.

मोबदला वाढवून देण्याच्या मागणीवर नरेंद्र पाटील ठाम आहे, म्हणूनच त्याने हे अनुदान नाकारलं. धुळ्याच्या धर्मा पाटील यांना अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. सानुग्रह अनुदान एक महिन्याच्या आत मिळेल असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं होतं.

संबंधित बातम्या

15 लाखांचं अनुदान धर्मा पाटलांच्या मुलाने नाकारलं

मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ex CM Prithviraj Chavan meet Dharma Patils family, who attempt suicide
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV