भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी माजी राज्यमंत्र्यांचं विहिरीत उपोषण

बोरी गावातील एका विहिरीच्या तळाशी बसून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली..

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी माजी राज्यमंत्र्यांचं विहिरीत उपोषण

बुलडाणा : पाणी पुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करत माजी राज्यमंत्री सुबोध सावजींनी बुलडाण्यात अनोखं आंदोलन केलं. बोरी गावातील एका विहिरीच्या तळाशी बसून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली..

या प्रकरणात चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी सुबोध सावजी यांनी केली. कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्याच्या पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा सुबोध सावजी यांचा आरोप आहे.

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षात विविध योजनेत विहिरींच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी सुबोध सावजी यांनी केलेली आहे. काल दुपारपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ex state minister protest in Well for inquiry of corruption
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: subodh savaji सुबोध सावजी
First Published:
LiveTV