कसाऱ्याजवळ मेलच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सकाळी साडेसातच्या दरम्यान पंजाब मेल कसाऱ्याहून मुंबईकडे येत होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा-मुंबई लोकल सेवा ठप्प झाली आहे.

कसाऱ्याजवळ मेलच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कसारा : कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळी साडेसातच्या दरम्यान पंजाब मेल कसाऱ्याहून मुंबईकडे येत होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा-मुंबई लोकल सेवा ठप्प झाली आहे. कार्यालयीन वेळेदरम्यानच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं नोकरदारांची मोठी गैरसोय झाली आहे.

या मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस जागच्या जागी थांबल्या आहेत.  रेल्वे प्रशासनाकडून इंजिन दुरूस्तीसाठी त्वरीत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV