प्रीतम मुंडेंचं बनावट लेटरपॅड वापरुन जमीन हडपण्याचा डाव फसला

विशेष म्हणजे या लेटरपॅडवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करुन तीन एकर जागा मिळवण्याचाही प्रयत्न झाला.

प्रीतम मुंडेंचं बनावट लेटरपॅड वापरुन जमीन हडपण्याचा डाव फसला

बीड : बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचं बनावट लेटरपॅड वापरून पंडित दिनदयाळ धर्मार्थ रुग्णालय आणि गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली  जागा हाडपण्याचा डाव फसला आहे. विशेष म्हणजे या लेटरपॅडवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करुन तीन एकर जागा मिळवण्याचाही प्रयत्न झाला. याप्रकरणी रुग्णालय आणि निसर्गोपचार केंद्राच्या ट्रस्टींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ल्याची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. हे केंद्र प्रस्तावित आहे. सर्व्हे क्र. 47  मधील महादेवाची इनामी तीन एकर जमीन मंजूर करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र यासाठी शिफारस म्हणून जे पत्र दिलं ते बनावट आहे.

खासदार प्रीतम मुंडे यांचे स्वीय सहाय्यक नवनाथ सानप यांच्या फिर्यादीवरुन बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी पंडित दिनदयाळ धर्मार्थ रुग्णालय आणि गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या ट्रस्टींविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तूर्तास संबंधित ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल झालाय, मात्र मुख्य व्यक्तीपर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत.

बनावट लेटरपॅड तयार करणाऱ्या या इसमाने हा प्रस्ताव बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला. जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला. मुख्यमंत्री कार्यालयाने ही जागा मंजूर करून परत हा प्रस्ताव बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. यावेळी सीसी म्हणून एक पत्र प्रीतम मुंडे यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आलं. मात्र असा कोणताही आपला प्रस्ताव नसल्याचं लक्षात येताच प्रीतम मुंडेही चक्रावल्या.

आमदार-खासदारांच्या पत्राची शिफारस ही शासकीय कामकाजातील दैंनदिन बाब आहे. मात्र असा पत्रांची खातरजमा होणंही तितकंच गरजेचं आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन कामकाजातील बारकावे जशास तसे नक्कल करणाऱ्या या महाभागांना वेळीच आवर घातला नाही, तर सरकारी अधिकाऱ्यांसह नेतेही अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fake letter pad of MP pritam munde used for Land grab
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV