ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठेंचं दीर्घ आजारानं निधन

ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठे यांचं दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात रविवारी रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते.

ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठेंचं दीर्घ आजारानं निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठे यांचं दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात रविवारी रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते.

1940 साली ह मो मराठेंचा जन्म झाला. त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्यांचं लिखाण केलं. लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हमोंनी पत्रकारीतेमध्येही आपला ठसा उमटवला होता. त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात काम केलं. तसंच लोकप्रभा, पुढारी, घरदार, मार्मिक, नवशक्ती आदी नियतकालिकांसाठीही लिखाण केलं.

आज सोमवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ह मो मराठेंचा अल्पपरिचय

ह मो मराठेंची पहिली नाटिका 1956 साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रकाशित

साधना साप्ताहिकात 1969 साली प्रकाशित झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ कादंबरीमुळे खरी ओळख

ह मो मराठेंची ग्रंथसंपदा

अण्णांची टोपी (कथासंग्रह)

काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)

इतिवृत्त

देवाची घंटा

न्यूज स्टोरी

चुनाव रामायण (व्यंगकथा)

घोडा

टार्गेट

ज्वालामुख (कथासंग्रह)

न लिहिलेले विषय (वैचारिक)

निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (1972)

पहिला चहा (भाग 1, 2). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.

पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा 2रा भाग)

द बिग बॉस (व्यंगकथा)

दिनमान (उपरोधिक लेख)

इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)

आजची नायिका (उपरोधिक)

उलटा आरसा (उपरोधिक)

एक माणूस एक दिवस (भाग 1 ते 3)

कलियुग

प्रास्ताविक

बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)

बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)

माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)

युद्ध

लावा (हिंदी)

वीज (बाल साहित्य)

श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)

सॉफ्टवेअर

स्वर्गसुखाचे package (विनोदी)

हद्दपार

मधलं पान (लेखसंग्रह)

मार्केट (१९८६)

मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)

ह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह)

पुस्तिका

आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी

गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ

ब्राह्मण चळवळ कशासाठी?

ब्राह्मणनिंदेची नवी लाट

ब्राह्मणमानस

ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (२००४)

विद्रोही ब्राह्मण

शिवधर्म

संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का?

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV