कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा

तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं?

कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती.

हे अर्ज भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. काहींचे आधार कार्डचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत नाही. अनेक शेतकरी सुविधा केंद्राच्या रांगेत उभं राहून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Karjamafi, loan waiver-compressed

तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं? असा प्रश्न असेल, तर त्यासाठी सोपा मार्ग आहे.

  • इथे क्लिक करा 

  • होमपेजवर उजव्या बाजूला अर्जदारांची यादी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा

  • तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि सर्च Search वर क्लिक करा

  • तुमच्या गावातील कर्जमाफीसाठी अर्ज केलेली नावं दिसतील

  • तुमचं नाव नसेल तर परत फॉर्म भरा


Loan waiver form list

संबंधित बातम्या

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ 

10 लाख शेतकरी बोगस, त्यांनाच कर्जमाफीचे फॉर्म भरताना अडचणी: चंद्रकांत पाटील


चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चीड आणणारं: नाना पटोले

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV