वर्ध्यात वाघिणीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

मदतीचा धनादेश देण्यासाठी पोहोचलेल्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना गावकऱ्यांनी हाकलून लावलं आणि एक गाडी सुद्धा पेटवली.

वर्ध्यात वाघिणीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील  शेतकऱ्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर गावातील वातावरण तापलं आहे.

आज मृतदेह शवविच्छेदनानंतर गावात पोहचताच, पुन्हा वातावरण भडकलं. मदतीचा धनादेश देण्यासाठी पोहोचलेल्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना गावकऱ्यांनी हाकलून लावलं आणि एक गाडी सुद्धा पेटवली.

भिवाजी हलके या शेतकऱ्याचा काल सायंकाळी शेतातून परत येताना चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी गावात पोहोचताच वातावरण पेटलं आणि वाघिणीवर लक्ष ठेवण्यासाठी आलेल्या वाईल्ड लाईफ टीमच्या लोकांना हाकलून लावले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV