शेतकरी आत्महत्यांचा तपास आठवड्यात करा, सरकारचे आदेश

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी एका आठवड्यात पूर्ण करावा, असं परिपत्रकच राज्य सरकारनं काढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास पोलिस निरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

शेतकरी आत्महत्यांचा तपास आठवड्यात करा, सरकारचे आदेश

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी एका आठवड्यात पूर्ण करावा, असं परिपत्रकच राज्य सरकारनं काढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास पोलिस निरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासंबंधी  काल झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्याच्या मृत्यूचं कारण तात्काळ शोधणं गरजेचं असल्यानं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष द्यावं असे निर्देशही या पत्रकातून देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेनं दोन दिवसात आपला अहवाल पोलिसांना सोपवावा असे आदेशही या परिपत्रकातून देण्यात आले. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यास मदतच होणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV